प्लॉट खरेदीनंतर प्लॉटचा ताबा घेणे महत्वाचे आहे. तसेच प्लॉटसंबंधी कागदपत्रांवरती आपले नाव लावणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळेस आपण प्लॉट घेतल्यानंतर कित्येक वर्ष त्या प्लॉटकडे फिरकतही नाही. आपल्याला वाटते कि जागा थोडीच चोरी होणार आहे. परंतु अलीकडील काळामध्ये प्लॉट परस्पर विक्रीचे व अतिक्रमणाचे प्रमाण वाढतच आहेत. त्यामुळे बऱ्याच प्लॉट धारकांची फसवणूक होत आहे. फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी प्लॉट खरेदीनंतर प्लॉटचा रीतसर ताबा घेणे महत्वाचे आहे. ताबा कसा घ्यावा व आवश्यक कागदपत्रे कशी काढावीत याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. प्रत्येक्ष प्लॉटचा ताबा कसा घ्यावा. १. प्लॉट खरेदीकेल्यानंतर ज्याच्याकडून प्लॉट खरेदी केला आहे त्या व्यक्तीकडून प्रत्येक्ष जागेची मोजणी करून, प्लॉटच्या चारही कोपर्यावरती दगडी किंवा सिमिंटचे पोल रोवावेत. २. यानंतर प्लॉटच्या सर्व बाजूस लोखंडी किंवा सि...
घराच्या बांधकामासंदर्भात संपूर्ण माहिती व योग्य पद्धती.