मुख्य सामग्रीवर वगळा

सुंदर घराचे वास्तुशास्त्र

    आपल्या घरामध्ये सुख, शांतता, समृद्धी राहण्यासाठी, आपले घर बांधकाम करत असताना वास्तुशास्त्राचा विचार करावा लागतो . घरामधील रूमचे नियोजन कसे असावे ते खालीलप्रमाणे .

१. हॉल
सर्वात चांगली दिशा - वायव्य
चांगली दिशा - उत्तर, पूर्व, पश्चिम, ईशान्य, आग्नेय
येथे नसावे - दक्षिण, नैऋत्य

२. स्वयंपाकघर                             
सर्वात चांगली दिशा - आग्नेय
चांगली दिशा - दक्षिण, पूर्व
येथे नसावे - उत्तर, पश्चिम, ईशान्य, वायव्य, नैऋत्य

३. बेडरूम                                    
सर्वात चांगली दिशा - नैऋत्य
चांगली दिशा - उत्तर, दक्षिण, पश्चिम, आग्नेय
येथे नसावे - पूर्व, ईशान्य, वायव्य

४. पूजा घर                                   
सर्वात चांगली दिशा - ईशान्य
चांगली दिशा - उत्तर, पूर्व, पश्चिम, वायव्य, आग्नेय
येथे नसावे - दक्षिण, नैऋत्य

 ५. टॉयलेट                                    
सर्वात चांगली दिशा - वायव्य
चांगली दिशा - उत्तर, दक्षिण, पश्चिम, आग्नेय
येथे नसावे - पूर्व, ईशान्य, नैऋत्य

६. जिना                                     
सर्वात चांगली दिशा - नैऋत्य
चांगली दिशा - दक्षिण, पश्चिम, वायव्य, आग्नेय
येथे नसावे - उत्तर ,पूर्व ,ईशान्य

७. जमिनीवरील पाण्याची टाकी   
सर्वात चांगली दिशा - ईशान्य
चांगली दिशा - उत्तर, पूर्व
येथे नसावे - दक्षिण, पश्चिम, वायव्य, आग्नेय

 ८. छतावरील पाण्याची टाकी        
सर्वात चांगली दिशा - पश्चिम
चांगली दिशा - दक्षिण, नैऋत्य
येथे नसावे - उत्तर, पूर्व, ईशान्य, वायव्य, आग्नेय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बांधकाम परवाना कसा काढावा ?

                   शहरी भागात किंवा ग्रामीण भागात बांधकाम करायचे असेल तर सर्वानाच बांधकाम परवाना घ्यावा लागतो.               शहरी भाग किंवा ग्रामीण भागासाठी बांधकाम परवाना काढण्यासाठी काही नियम आहेत. व ते वेगवेगळ्या सरकारी विभागांमधून मिळवता येतात. बांधकाम परवाना काढण्यासाठीची कागदपत्रे व तो कसा व कोठून काढावा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.  अ. शहरी भाग बांधकाम परवाना कसा काढावा ?                            शहरी भागामध्ये बांधकाम परवाना काढावयाचा असल्यास तो आपल्याला नगरपालिका किंवा महानगरपालिका या सरकारी कार्यालयाकडून काढता येतो.                     अलिकडील काळात शहरी भागातील बांधकाम परवानगीचे प्रकरण परवानाधारक स्थापत्य अभियंते किंवा वास्तुविशारद यांच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने नगरपालिका किंवा महानगरपालिका या कार्यालयाकडे दाखल करता येते.   ...

प्लॉट घेताना काय पहावे ?

                प्लॉट घेत असते वेळेस प्लॉटचे क्षेत्रफळ, प्लॉटची लांबी रुंदी,  प्लॉटवरती एफएसआय कितीआहेते पहावे . प्लॉटवरती बांधकाम नियमावलीनुसार बांधकाम होणार आहे कि नाही ते पहावे .                  प्लॉटवरून विद्युत वाहिनी तारा जात नसाव्यात. तसेच प्लॉटच्या जवळपास स्मशानभूमी, कचराडेपो, मोठा आवाज करणारे कारखाने तसेच सार्वजनिक वास्तू किंवा भवन आहेत का ते पहावे. याचा भविष्यात आपल्याला त्रास होईल कि नाही याची खात्री करावी . प्लॉट घेताना खालील कागदपत्रे पहावीत.  १ . अकृषिक परवानगी [एन.  ए.  ऑर्डर ] २ . मंजूर नकाशा [फायनल लेआऊट] नगररचना विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, या संस्थेची मान्यता आहे का ते पहावे . ३ . ७/१२ उतारा . शक्यतो संगणीकृत असावा . ४ . मोजणी नकाशा, भूमी अभिलेख विभाग ५ . प्लॉटवरती कर्ज नसल्याची खात्री करावी . ६ . वकिलाकडून प्लॉटचा सर्च रिपोर्ट काढावा .

प्लॉट खरेदीनंतर काय करावे?

             प्लॉट खरेदीनंतर प्लॉटचा ताबा घेणे महत्वाचे आहे. तसेच प्लॉटसंबंधी कागदपत्रांवरती आपले नाव लावणे महत्वाचे आहे.                    बऱ्याच वेळेस आपण प्लॉट घेतल्यानंतर कित्येक वर्ष त्या प्लॉटकडे फिरकतही नाही. आपल्याला वाटते कि जागा थोडीच चोरी होणार आहे. परंतु अलीकडील काळामध्ये प्लॉट परस्पर विक्रीचे व अतिक्रमणाचे प्रमाण वाढतच आहेत. त्यामुळे बऱ्याच प्लॉट धारकांची फसवणूक होत आहे.                    फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी प्लॉट खरेदीनंतर प्लॉटचा रीतसर ताबा घेणे महत्वाचे आहे.  ताबा कसा घ्यावा व आवश्यक कागदपत्रे कशी काढावीत याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.  प्रत्येक्ष प्लॉटचा ताबा कसा घ्यावा.   १. प्लॉट खरेदीकेल्यानंतर ज्याच्याकडून प्लॉट खरेदी केला आहे त्या व्यक्तीकडून प्रत्येक्ष जागेची मोजणी करून, प्लॉटच्या चारही कोपर्यावरती दगडी किंवा सिमिंटचे पोल रोवावेत.  २. यानंतर प्लॉटच्या सर्व बाजूस लोखंडी किंवा सि...