प्लॉट घेत असते वेळेस प्लॉटचे क्षेत्रफळ, प्लॉटची लांबी रुंदी, प्लॉटवरती एफएसआय कितीआहेते पहावे . प्लॉटवरती बांधकाम नियमावलीनुसार बांधकाम होणार आहे कि नाही ते पहावे .
प्लॉटवरून विद्युत वाहिनी तारा जात नसाव्यात. तसेच प्लॉटच्या जवळपास स्मशानभूमी, कचराडेपो, मोठा आवाज करणारे कारखाने तसेच सार्वजनिक वास्तू किंवा भवन आहेत का ते पहावे. याचा भविष्यात आपल्याला त्रास होईल कि नाही याची खात्री करावी .
प्लॉट घेताना खालील कागदपत्रे पहावीत.
१. अकृषिक परवानगी [एन. ए. ऑर्डर ]२. मंजूर नकाशा [फायनल लेआऊट] नगररचना विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, या संस्थेची मान्यता आहे का ते पहावे .
३. ७/१२ उतारा . शक्यतो संगणीकृत असावा .
४. मोजणी नकाशा, भूमी अभिलेख विभाग
५. प्लॉटवरती कर्ज नसल्याची खात्री करावी .
६. वकिलाकडून प्लॉटचा सर्च रिपोर्ट काढावा .
माझी मालकीची जागेवर पत्रा शेट केबिन बांधणे ची परवानगी नगरपालिका देत नाही.
उत्तर द्याहटवा