मुख्य सामग्रीवर वगळा

About Us

About Us

घर असावे घरासारखे 
नकोत नुसत्या भिंती 
इथे असावा प्रेम-जिव्हाळा 
नकोत नुसती नाती. 

             वरील पंक्तीप्रमाणे स्वतःचे एक सुंदर घर असावे असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. ते सत्यात उतरवत असताना प्लॉट घेण्यापासून ते घराचे प्रत्यक्षात बांधकाम पूर्ण होईपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. 
             या अडचणी लक्षात घेऊन घर बांधकामातील प्राथमिक माहिती व योग्य पद्धती आपल्या बोली भाषेत आपल्यापर्यंत पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. 
               याचा उपयोग बांधकाम व्यवसायिक,स्थापत्य अभियंते व सर्वसामान्य नागरिकांसाठी होईल अशी आशा बाळगतो.

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at amitrajguru11@gmaill.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बांधकाम परवाना कसा काढावा ?

                   शहरी भागात किंवा ग्रामीण भागात बांधकाम करायचे असेल तर सर्वानाच बांधकाम परवाना घ्यावा लागतो.               शहरी भाग किंवा ग्रामीण भागासाठी बांधकाम परवाना काढण्यासाठी काही नियम आहेत. व ते वेगवेगळ्या सरकारी विभागांमधून मिळवता येतात. बांधकाम परवाना काढण्यासाठीची कागदपत्रे व तो कसा व कोठून काढावा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.  अ. शहरी भाग बांधकाम परवाना कसा काढावा ?                            शहरी भागामध्ये बांधकाम परवाना काढावयाचा असल्यास तो आपल्याला नगरपालिका किंवा महानगरपालिका या सरकारी कार्यालयाकडून काढता येतो.                     अलिकडील काळात शहरी भागातील बांधकाम परवानगीचे प्रकरण परवानाधारक स्थापत्य अभियंते किंवा वास्तुविशारद यांच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने नगरपालिका किंवा महानगरपालिका या कार्यालयाकडे दाखल करता येते.   ...

चांगला प्लॉट कसा असावा ?

          प्लॉट खरेदी करत असताना तो चांगला असावा असे सर्वानाच वाटते. चांगला प्लॉट कसा असावा या बाबींचा विचार करत असताना त्यासंबंधी काही नियम पाळावे लागतात. यासंबंधी माहिती प्लॉटच्या जवळील लोकांकडून तसेच संबंधित सरकारी विभागामधून मिळू शकेल. प्लॉट कसा असावा यासंबंधित माहिती खालीलप्रमाणे.  १. प्लॉट हा निवासी झोन मध्येच असावा.  २.  प्लॉट हा शक्यतो आयत किंवा चौरस आकारात असावा.  ३. प्लॉट   हा   सपाट पृष्ठभागावरती असावा. तो जमीन लेव्हल पासून जास्त खोलीवरती किंवा टेकडीवरती नसावा .  ४. पाया कमी खोलीवरती असावा. म्हणजेच जमीन लेव्हल पासून किती खोलीवरती काळी माती, मुरूम, दगड हे पहावे.                    पाया जास्त खोलीवरती असेल तर घर बांधकाम करत असताना बांधकाम खर्च जास्त होउ शकतो याउलट पाया कमी अंतरावर असेल तर बांधकाम खर्चाची बचत होऊ शकते.  ५. प्लॉटच्या जवळपास नदी, नाला, ओढा नसावा. कारण याचा पावसाळ्यात आपल्याला त्रास होऊ शकतो.  ६. प्लॉट हा बांधकाम परवानगी करिता ज...

प्लॉट घेताना काय पहावे ?

                प्लॉट घेत असते वेळेस प्लॉटचे क्षेत्रफळ, प्लॉटची लांबी रुंदी,  प्लॉटवरती एफएसआय कितीआहेते पहावे . प्लॉटवरती बांधकाम नियमावलीनुसार बांधकाम होणार आहे कि नाही ते पहावे .                  प्लॉटवरून विद्युत वाहिनी तारा जात नसाव्यात. तसेच प्लॉटच्या जवळपास स्मशानभूमी, कचराडेपो, मोठा आवाज करणारे कारखाने तसेच सार्वजनिक वास्तू किंवा भवन आहेत का ते पहावे. याचा भविष्यात आपल्याला त्रास होईल कि नाही याची खात्री करावी . प्लॉट घेताना खालील कागदपत्रे पहावीत.  १ . अकृषिक परवानगी [एन.  ए.  ऑर्डर ] २ . मंजूर नकाशा [फायनल लेआऊट] नगररचना विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, या संस्थेची मान्यता आहे का ते पहावे . ३ . ७/१२ उतारा . शक्यतो संगणीकृत असावा . ४ . मोजणी नकाशा, भूमी अभिलेख विभाग ५ . प्लॉटवरती कर्ज नसल्याची खात्री करावी . ६ . वकिलाकडून प्लॉटचा सर्च रिपोर्ट काढावा .