जमिनीचे तिच्या वापरानुसार विविध झोन तयार केलेले आहेत. प्लॉट घेण्यापूर्वी प्लॉट चा झोन कोणता आहे हे पाहणे महत्वाचे आहे. कारण झोन नुसार आपल्याला प्लॉट वरती बांधकाम परवानगी मिळत असते. जमिनीच्या झोन चे प्रकार व माहिती खालीलप्रमाणे.
१. निवासी झोन (आर -१)--
या झोन मधील प्लॉट मध्ये काही विशिष्ठ वापरासाठीच बांधकाम परवानगी मिळते. याची माहिती खालीलप्रमाणे.
१. सर्व प्रकारची निवासी घरे.
२. सर्व वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या इमारती.
३. प्राथमिक शाळा, नर्सरी शाळा, हॉस्टेल.
४. धार्मिक वापरासाठीच्या इमारती. उदा. भक्तनिवास.
५. वस्तुसंग्रहालय व सार्वजनिक वाचनालय.
६. घरगुती उद्योग.
७. पार्क, मैदाने.
८. सर्वप्रकारच्या पिठाच्या गिरण्या.
९. लहान आकाराचे व्यवसाय, दररोज वापरातील वस्तूंची दुकाने. उदा. भाजीपाला विक्री, रेशन दुकान आणि बेकारी.
टीप- या झोनमध्ये फक्त निवासी आणि काही ठराविक व्यवसायांच्या वापरासाठी बांधकाम परवानगी मिळते.
२. निवासी झोन (आर -२)--
या झोन मधील प्लॉट मध्ये काही विशिष्ठ वापरासाठीच बांधकाम परवानगी मिळते. याची माहिती खालीलप्रमाणे.
१. सर्व प्रकारची निवासी घरे.
२. व्यापारी म्हणजेच किरकोळ विक्रीची दुकाने.
३. सेवा पुरविणाऱ्या संस्था.
४. डिजिटल मार्केटिंग सेवा.
५. व्यापारी हॉल, सभागृहे, व्यायामशाळा, कार्यालये व सिनेमागृहे.
६. हॉटेल व रेस्टोरंट.
७. वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या इमारती.
टीप- या झोनमध्ये फक्त निवासी आणि काही ठराविक व्यवसायांच्या वापरासाठी बांधकाम परवानगी मिळते.
३. व्यापारी झोन --
निवासी झोन आर -१, व आर -२, मधील सर्व प्रकारच्या इमारतींना बांधकाम परवानगी मिळते.
४. औद्योगिक झोन --
औद्योगिक झोन मधील प्लॉट मध्ये उद्योगधंद्यांसंबंधी वापरासाठी परवानगी मिळते. त्याची माहिती खालीलप्रमाणे.
१. सर्व प्रकारच्या उद्योगधंद्यांसाठी वापर करता येतील अश्या इमारती.
२. उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या सेवा उदा. बँक, कँटीन.
३. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठीच्या निवासी इमारती.
टीप-सर्व प्रकारच्या उद्योगधंद्यांसंबंधी वापरासाठी बांधकाम परवानगी मिळते.
५. शेती झोन / ना-विकास झोन--
शेती झोनमध्ये शेती संबंधी वापरासाठी बांधकाम परवानगी मिळते. उदा. वेअरहाऊस, शेळी पालन, कुक्कुटपालन, वराहपालन, मधमाशीपालन इ.
टीप. घर बांधकामासाठी बांधकाम परवानगी मिळत नाही.
६. पब्लिक व सेमी पब्लिक झोन --
या झोनमध्ये नागरिकांसाठी सेवा पुरविणाऱ्या इमारतींचा समावेश होतो. उदा. सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था, शासकीय इमारती, सिनेमागृहे, वृद्धाश्रम व मंगलकार्यालये.
टीप. नागरिकांना सेवा पुरविणाऱ्या इमारतींना बांधकाम परवानगी मिळते.
७. आरक्षित झोन --
शैक्षणिक संस्था, सरकारी दवाखाने, बस स्थानक, भाजी मंडई, क्रीडांगणे, बगीचा व नाट्यगृहे यासाठी वापर करता येतो.
८. इ . डब्लू . एस . झोन --
आर्थिक दृष्टीने मागासलेल्या घटकांसाठी हा झोन राखीव ठेवलेला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा