मुख्य सामग्रीवर वगळा

बांधकाम परवाना कसा काढावा ?

                   शहरी भागात किंवा ग्रामीण भागात बांधकाम करायचे असेल तर सर्वानाच बांधकाम परवाना घ्यावा लागतो. 
             शहरी भाग किंवा ग्रामीण भागासाठी बांधकाम परवाना काढण्यासाठी काही नियम आहेत. व ते वेगवेगळ्या सरकारी विभागांमधून मिळवता येतात. बांधकाम परवाना काढण्यासाठीची कागदपत्रे व तो कसा व कोठून काढावा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. 
अ. शहरी भाग बांधकाम परवाना कसा काढावा ?
                           शहरी भागामध्ये बांधकाम परवाना काढावयाचा असल्यास तो आपल्याला नगरपालिका किंवा महानगरपालिका या सरकारी कार्यालयाकडून काढता येतो. 
                   अलिकडील काळात शहरी भागातील बांधकाम परवानगीचे प्रकरण परवानाधारक स्थापत्य अभियंते किंवा वास्तुविशारद यांच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने नगरपालिका किंवा महानगरपालिका या कार्यालयाकडे दाखल करता येते. 
                        विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार तयार केलेला बांधकामाचा नकाशा. बांधकाम नकाशामध्ये प्लॅन, इलेव्हशन, क्रॉस सेकशन, जिन्याची रुंदी, छताची उंची, सामासिक अंतरे, अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक सूची दर्शवणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने तयार केलेला नकाशा व सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने दाखल करणे आवश्यक आहे. 
                         शहरी भागामध्ये वाढीव शहरी भाग, गावठाण व गुंठेवारी या भागांचा समावेश होतो. या सर्व भागांसाठी बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे. 
१. शहरीभाग वाढीव बांधकाम परवानगी 
१. खरेदीखत किंवा मालकी हक्कासंबंधी कागदपत्रे. 
२. बिनशेती आदेश. 
३. मंजूर रेखांकनाची प्रत . 
४. ७/१२ उतारा [चालू तारखेचा]. 
५. सिटी सर्व्हे उतारा. 
६. प्रॉपर्टी कार्ड. 
७. मोजणीचा नकाशा. 
८. नामांतरण आदेश. 
९. कर भरलेली पावती चालू वर्षातील नगरपालिका किंवा महानगरपालिका. 
१०. अफेडेव्हिट १०० रु स्टॅम्प पेपर नोटरीसह. 
११. आधारकार्ड मोबाईल नंबर लिंक असावा. 
१२. ई-मेल आयडी. 
२ . शहरीभाग गावठाण बांधकाम परवानगी 
१. मालकी हक्कासंबंधी कागदपत्रे. 
२. सिटी सर्व्हे नकाशा. 
३. मोजणीचा नकाशा. 
४. झोनिंग डिमार्केशन. 
५. कर भरलेली पावती चालू वर्षातील नगरपालिका किंवा महानगरपालिका. 
६. अफेडेव्हिट १०० रु स्टॅम्प पेपर नोटरीसह. 
७. आधारकार्ड मोबाईल नंबर लिंक असावा. 
८. ई-मेल आयडी. 
३ . शहरीभाग गुंठेवारी बांधकाम परवानगी 
१. खरेदीखत किंवा मालकी हक्कासंबंधी कागदपत्रे. 
२. ७/१२ उतारा [चालू तारखेचा]. 
३. गुंठेवारी नियमित कारणेबाबतचा आदेश. 
४. कर भरलेली पावती चालू वर्षातील नगरपालिका किंवा महानगरपालिका. 
५. अफेडेव्हिट १०० रु स्टॅम्प पेपर नोटरीसह. 
६. आधारकार्ड मोबाईल नंबर लिंक असावा. 
७. ई-मेल आयडी.
ब . ग्रामीण भाग बांधकाम परवाना कसा काढावा ?
                          ग्रामीण भागामध्ये बांधकाम परवाना काढावयाचा असल्यास तो आपल्याला नगर रचना विभाग या सरकारी कार्यालयाकडून काढता येतो.
                  नगर रचना विभागाकडे बांधकाम परवानगी प्रकरण परवानाधारक स्थापत्य अभियंता किंवा वास्तूविशारद यांच्या मार्फत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. 
                  ग्रामीण भागामध्ये गावठाण हद्दीबाहेरील व गावठाण हद्दीमधील बांधकाम परवानगी मिळते. बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे.
१. गावठाण हद्दीबाहेर बांधकाम परवानगी 
१. गावठाण हद्दीबाहेर जागा असल्याबाबतचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र.
२. ७/१२ उतारा ,बिनशेती आदेश आणि मंजूर रेखांकनाची प्रत.
३. सिटी सर्व्हे झाला असल्यास सिटी सर्व्हेचा उतारा व सनद नकाशा.
४. बांधकाम करावयाच्या क्षेत्रासमोरील रस्त्याची रुंदी.
५. वास्तुविशारद यांनी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार तयार केलेल्या बांधकाम नकाशाच्या ५ प्रती, त्यावर वास्तुविशारद व अर्जदार यांची स्वाक्षरी.
६. बांधकाम नकाशामध्ये प्लॅन, इलेव्हशन, क्रॉस सेकशन, जिन्याची रुंदी, छताची उंची, सामासिक अंतरे, अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक सूची दर्शवणे आवश्यक आहे.
७. बांधकाम परवानगी प्रकरण उपविभागीय अधिकारी / तहसीलदार यांचेकडून नगर रचना विभाग यांचेकडे दाखल करणे.
८. बांधकाम परवानगी प्रकरण प्राप्त झाल्यानंतर छाननी फी रु. २/- प्र. चौ. मी. विकास शुल्क २% व रेखांकनास अंतिम मंजुरी घेतली नसल्यास ३०% दराने अधिमूल्य शुल्क भरणे आवश्यक आहे.
९. मा . जिल्हाधिकारी अथवा संबंधीत महसूल अधिकारी यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशावर व्यथित झालेल्या व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील नियम क्र. ४६ नुसार मा. सहसंचालक, नगर रचना विभाग यांचेकडे अपील करता येते.
१०. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदींचा अर्थ लावण्यामध्ये काही विवाद असल्यास त्याबाबतची स्पष्टता करण्यासाठी व्यथित व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या नियम क्र. ४४ नुसार मा. संचालक, नगर रचना, महाराष्ट राज्य यांचेकडे अर्ज सादर करावा.
२. गावठाण हद्दीमधील बांधकाम 
१. गावठाण हद्दीमध्ये  जागा असल्याबाबतचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र.
२. ग्रामपंचायत कार्यालयाकडील नमुना ८ दाखला / खरेदीखत.
३. सिटी सर्व्हे झाला असल्यास सिटी सर्व्हेचा उतारा व सनद नकाशा / ग्रामसेवक यांचेकडील जागेच्या चतु;र्सिमा व रस्त्याची रुंदी दर्शवणारा नकाशा.
४. बांधकाम करावयाच्या क्षेत्रासमोरील रस्त्याची रुंदी.
५. वास्तुविशारद यांनी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार तयार केलेल्या बांधकाम नकाशाच्या ५ प्रती, त्यावर वास्तुविशारद व अर्जदार यांची स्वाक्षरी.
६. बांधकाम नकाशामध्ये प्लॅन, इलेव्हशन, क्रॉस सेकशन, जिन्याची रुंदी, छताची उंची, सामासिक अंतरे, अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक सूची दर्शवणे आवश्यक आहे. 
७. बांधकाम परवानगी प्रकरण गटविकास अधिकारी  यांचेकडून नगर रचना विभाग यांचेकडे दाखल करणे . 
८. बांधकाम परवानगी प्रकरण प्राप्त झाल्यानंतर छाननी फी रु.  २/- प्र. चौ. मी. विकास शुल्क २% भरणे.
९. मा. जिल्हाधिकारी अथवा संबंधीत महसूल अधिकारी यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशावर व्यथित झालेल्या व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील नियम क्र. ४६ नुसार मा. सहसंचालक, नगर रचना विभाग यांचेकडे अपील करता येते.
१०. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदींचा अर्थ लावण्यामध्ये काही विवाद असल्यास त्याबाबतची स्पष्टता करण्यासाठी व्यथित व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या नियम क्र.४४ नुसार मा. संचालक, नगर रचना, महाराष्ट राज्य यांचेकडे अर्ज सादर करावा.



टीप -सर्व प्रकारचे बांधकाम परवाने हे फक्त एका वर्षासाठी वैध असतात. 

टिप्पण्या

  1. माझे घर ३० वर्षापासून ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे.जुन्या पद्धतीचे घर असल्याने नवीन बांधकाम करायचे आहे.त्यासाठी बांधकाम परमिशन घायची आवशकता आहे का? तसेच जुने घरांची रचना एकाला एक चिकटून अशी होती.परंतु आता कशा पद्धतीने बांधकाम करावे.

    उत्तर द्याहटवा
  2. माझा गाला रास्ट्रीय रोड क्रमांक ७३ला लागुन आहे,ऐकून ६० स्क़वेरफुट आहे.नगर पंचायत हड्डीतील आहे,त्याचे भू भाडे किती द्यावे

    उत्तर द्याहटवा
  3. माझे घर 30वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. सातबारा चार भावांच्या नावाने आहे माझे जुने घर पाडुन परत बांधण्यासाठी परवाना आवश्यक आहे का?

    उत्तर द्याहटवा
  4. आमचा प्लॉट गावठाण क्षेत्रात येत नाही.त्यामुळे ग्रामपंचायत घर बांधकामाची परवानगी देत नाही.तसेच नगर रचना कार्यालय सुद्धा परवानगी देत नाही. गृहकर्ज घेणे आहे.काय करावे?

    उत्तर द्याहटवा
  5. आमचा प्लॉट गावठाण क्षेत्रात येत नाही त्यामुळे ग्रामपंचायत घर बांधकामाची परवानगी देत नाही.तसेच नगर रचना कार्यालय सुद्धा परवानगी देत नाही. गृह कर्ज घेणे आहे.काय करावे?

    उत्तर द्याहटवा
  6. माझी जागा 770 स्क्वेअर फिट मध्ये आहे त्याकरिता बांधकामा परवाना घ्यावा लागेल का नगरपरिषद हद्दीमध्ये आहे कृपया मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. १५० चौ. मि. क्षेत्रफळ पर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना परवानगीची गरज नाही.

      हटवा
    2. खरच परवानगी ची जरूरत नाही

      हटवा
  7. आमचे मुंबई ३५ वर्षे वास्तव असून..गेली २५ वर्षापूर्वी केलेले बांधकाम जुने झाले आहे..तर ते फक्त दुरुस्त करावयाचे आहे..त्यासाठी ही महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते का..?

    उत्तर द्याहटवा
  8. २०१३ साली नगर पालिका हद्दीत बांधकाम केले आहे मला आता बांधकाम परवानगी बॅंक लोन साठी हवी आहे मिळते का

    उत्तर द्याहटवा
  9. माझे घर ३० वर्षापासून ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे.जुन्या पद्धतीचे घर असल्याने नवीन बांधकाम करायचे आहे.त्यासाठी बांधकाम परमिशन घायची आवशकता आहे का? तसेच जुने घरांची रचना एकाला एक चिकटून अशी आहे ,मला त्वरीत शासन निर्णय सांगा

    उत्तर द्याहटवा
  10. माझे प्लॉट ग्रामपंचायत क्षेत्रात गावठाण बाहेर आहे जे की 150 चौ. मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे. प्लॉट NA आहे. loan ghyache आहे बांधकाम परवानगी कोण देणार

    उत्तर द्याहटवा
  11. मी कार्पोरेश हद्दीमध्ये 600 स्केर फुट जागा घेत आहे व बांधकाम करत आहे तर कोणती परवानगी लागेल लागेल क

    उत्तर द्याहटवा
  12. माझ्या पूर्वीच्या आयताकृती १५५० sq. ft. प्लॉट मध्ये बांधकामाच्या दोन्ही बाजूने कंपाउंड पासून आत ३.५ फूट जागा सोडलेली आहे. जागा नगर परीषद हद्दीत आहे. आधीच्या बांधकामाची परवानगी आहे. बांधकामाच्या पुढे रस्ता असून १० ft जागा सोडली असून मागे ५ ft जागा सोडलेली आहे

    खोल्या अरुंद असल्यामुळे मला आता वाढीव बांधकाम करायचे असून एका बाजूचे सोडलेले ३.५ फूट मुख्य बांधकामात घ्यायचे आहे. यासाठी काही अडचण येऊ शकते का? बाजूच्या हद्दीपासून काही जागा सोडणे बंधनकारक आहे का? तसेच वाढीव बांधकामावर शेजारी काही आक्षेप घेऊ शकतात का?

    उत्तर द्याहटवा
  13. ग्रामपंचायत हद्दीतील जमीन लेआऊट प्लॅन ऑनलाईन मिळू शकतो का आनी मिळत असेल तर वेबसाईट कोणती अणि ऑनलाईन मिळत नसेल तर कोठून काढावा

    उत्तर द्याहटवा
  14. सर बांधकामाची परवानगी घेण्यासाठी कमीत कमी लांबी X रुंदी किती पाहिजे यासाठी काही शासनाचे नियम अटी आहेत का असेल तर कृपया माहिती मिळेल का

    उत्तर द्याहटवा
  15. मी घर बांधकाम परवानगी साठी सहा महिण्यापूर्वी अर्ज केला आहे, पण नगर परिषद ने अद्याप मंजूर केलेला नाही, कोणत्या नियम
    अनुसार मी बांधकाम सुरू करू शकतो । कृपया कळवा

    उत्तर द्याहटवा
  16. Prefab house किंवा modular home साठी नगरपंचायत ची परमिशन घ्यावी लागते का ?

    उत्तर द्याहटवा
  17. माझे घर जुन्या पद्धतीचे असून मला नवीन घर बनवायचे आहे माझी जागा 7/12 वर नमूद केल्या पेकाश जास्त आहे सगळी मिळून 2 गुंठे आहे त्यामधील 1 गुंठया मध्ये मी बांधकाम करणार आहे तर मला बांधकाम परवानगी गरज आहे का

    उत्तर द्याहटवा
  18. माझे घर ग्रामपंचायत हद्दीत आहे जुने घर 3 मजली करायचे आहे त्यासाठी ग्रामपंचायत ची permission घ्यावी लागते का

    उत्तर द्याहटवा
  19. मी दोन वेळा बांधकाम परमिशन टाकले दोन्ही वेळा परमिशन टाकून एक एक वर्ष वाट पाहिली परंतु मला दोन ते तीन वर्षात परमिशन मिळाली नाही तरी मी घराचे बांधकाम सुरू करू शकतो का बांधकाम केल्यावर मला काही अडचण येणार का कृपया करून उत्तर द्या सर

    उत्तर द्याहटवा
  20. आदरणीय सर माझे प्लॉट NAP.34 आहे तसेच 16 74 स्केअर फुट जागा आहे मी 2019 2020 या दोन वर्षात दोन वेळा परमिशन टाकले व चकरा मारून मारून महानगरपालिकेत परेशान झालो परंतु मला एकही वेळ परमिशन मिळाली नाही बांधकामाची तरी जर मी आता बांधकाम केले तर मला भविष्यात काही अडचण येणार का कृपा करून सर मार्गदर्शन करा

    उत्तर द्याहटवा
  21. माझा विकत घेतलेल्या प्लॉट गावठाण क्षेत्रात आहे की बाहेर हे कसे कळेल? गावठाण क्षेत्राबाहेर असल्यास घरबांधणी परवानगी कुणाकडून घ्यावी?

    उत्तर द्याहटवा
  22. माझा लेआऊट प्लॉट शहरी भागात आहे, त्यावर टिन शेड चे बांधकाम करायचे आहे, त्याला बांधकाम परवानगीसाठी कोणते दस्तावेज लागतील

    उत्तर द्याहटवा
  23. सर बांधकाम परवाना साठी सिटी सर्व्ह चा नकाशा गरजेचा आहे का

    उत्तर द्याहटवा
  24. आमच्या गावाचे सरपंच जर बांधकामासाठी अडचण करून ग्रामपंचायत मधून परवानगी देत नसतील तर दुसरा कोणता मार्ग आहे का परवानगी काढायचा

    उत्तर द्याहटवा
  25. शेतामध्ये घर बांधण्यासाठी काय करावे ?

    उत्तर द्याहटवा
  26. ४:५८ AM
    माझे घर ३० वर्षापासून ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे.जुन्या पद्धतीचे घर असल्याने नवीन बांधकाम करायचे आहे.त्यासाठी बांधकाम परमिशन घायची आवशकता आहे का? तसेच जुने घरांची रचना एकाला एक चिकटून अशी आहे ,मला त्वरीत शासन निर्णय सांगा

    उत्तर द्याहटवा
  27. नगर पंचायत, लांजा येथे घर बांधकाम परवानगी परवाना नूतनीकरणासाठी 4 महिन्यापूर्वी ऑनलाईन प्रस्ताव सादर केलाआहे. इंजिनिअर नाही असे सांगत होते. आता इंजिनिअर हजर होवून 4 महिने झाले तरी अद्याप नूतनीकरण होत नाही. इंजिनिअर सांगतात ऑनलाईन प्रकरण मुख्याधिकारी यांचेकडे पाठविले आहे. मुख्याधिकारी सांगतात मला ते ऑनलाईन दिसत नाही. यासाठी मार्ग काय आहे ? कारण मी घर बांधकामासाठी महावितरण कडून व्यापारी प्रकारचे लाईट मीटर घेतले आहे त्यामुळे O.C. शिवाय ते घरगुती प्रकारात करता येत नाही असे महावितरण सांगते. त्यामुळे 5-6 महिने झाले नाहक व्यापारी दराने वीज बील भरावे लागत आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगला प्लॉट कसा असावा ?

          प्लॉट खरेदी करत असताना तो चांगला असावा असे सर्वानाच वाटते. चांगला प्लॉट कसा असावा या बाबींचा विचार करत असताना त्यासंबंधी काही नियम पाळावे लागतात. यासंबंधी माहिती प्लॉटच्या जवळील लोकांकडून तसेच संबंधित सरकारी विभागामधून मिळू शकेल. प्लॉट कसा असावा यासंबंधित माहिती खालीलप्रमाणे.  १. प्लॉट हा निवासी झोन मध्येच असावा.  २.  प्लॉट हा शक्यतो आयत किंवा चौरस आकारात असावा.  ३. प्लॉट   हा   सपाट पृष्ठभागावरती असावा. तो जमीन लेव्हल पासून जास्त खोलीवरती किंवा टेकडीवरती नसावा .  ४. पाया कमी खोलीवरती असावा. म्हणजेच जमीन लेव्हल पासून किती खोलीवरती काळी माती, मुरूम, दगड हे पहावे.                    पाया जास्त खोलीवरती असेल तर घर बांधकाम करत असताना बांधकाम खर्च जास्त होउ शकतो याउलट पाया कमी अंतरावर असेल तर बांधकाम खर्चाची बचत होऊ शकते.  ५. प्लॉटच्या जवळपास नदी, नाला, ओढा नसावा. कारण याचा पावसाळ्यात आपल्याला त्रास होऊ शकतो.  ६. प्लॉट हा बांधकाम परवानगी करिता ज...

प्लॉट घेताना काय पहावे ?

                प्लॉट घेत असते वेळेस प्लॉटचे क्षेत्रफळ, प्लॉटची लांबी रुंदी,  प्लॉटवरती एफएसआय कितीआहेते पहावे . प्लॉटवरती बांधकाम नियमावलीनुसार बांधकाम होणार आहे कि नाही ते पहावे .                  प्लॉटवरून विद्युत वाहिनी तारा जात नसाव्यात. तसेच प्लॉटच्या जवळपास स्मशानभूमी, कचराडेपो, मोठा आवाज करणारे कारखाने तसेच सार्वजनिक वास्तू किंवा भवन आहेत का ते पहावे. याचा भविष्यात आपल्याला त्रास होईल कि नाही याची खात्री करावी . प्लॉट घेताना खालील कागदपत्रे पहावीत.  १ . अकृषिक परवानगी [एन.  ए.  ऑर्डर ] २ . मंजूर नकाशा [फायनल लेआऊट] नगररचना विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, या संस्थेची मान्यता आहे का ते पहावे . ३ . ७/१२ उतारा . शक्यतो संगणीकृत असावा . ४ . मोजणी नकाशा, भूमी अभिलेख विभाग ५ . प्लॉटवरती कर्ज नसल्याची खात्री करावी . ६ . वकिलाकडून प्लॉटचा सर्च रिपोर्ट काढावा .