प्लॉट खरेदी करत असताना तो चांगला असावा असे सर्वानाच वाटते. चांगला प्लॉट कसा असावा या बाबींचा विचार करत असताना त्यासंबंधी काही नियम पाळावे लागतात. यासंबंधी माहिती प्लॉटच्या जवळील लोकांकडून तसेच संबंधित सरकारी विभागामधून मिळू शकेल. प्लॉट कसा असावा यासंबंधित माहिती खालीलप्रमाणे.
१. प्लॉट हा निवासी झोन मध्येच असावा.
२. प्लॉट हा शक्यतो आयत किंवा चौरस आकारात असावा.
३. प्लॉट हा सपाट पृष्ठभागावरती असावा. तो जमीन लेव्हल पासून जास्त खोलीवरती किंवा टेकडीवरती नसावा .
४. पाया कमी खोलीवरती असावा. म्हणजेच जमीन लेव्हल पासून किती खोलीवरती काळी माती, मुरूम, दगड हे पहावे.
पाया जास्त खोलीवरती असेल तर घर बांधकाम करत असताना बांधकाम खर्च जास्त होउ शकतो याउलट पाया कमी अंतरावर असेल तर बांधकाम खर्चाची बचत होऊ शकते.
५. प्लॉटच्या जवळपास नदी, नाला, ओढा नसावा. कारण याचा पावसाळ्यात आपल्याला त्रास होऊ शकतो.
६. प्लॉट हा बांधकाम परवानगी करिता जास्तीत जास्त निर्देशांक [एफ. एस. आय] मिळणार असावा. [याची माहिती स्थापत्य अभियंता किंवा वास्तुविशारद यांचेकडून घ्यावी.]
७. प्लॉटच्या चारही बाजूने कुंपण असलेला असावा.
८. प्लॉटची लांबी रुंदी व क्षेत्रफळ मंजूर नकाशा प्रमाणे असावे.
९. प्लॉटला ड्रेनेज ची व्यवस्था असावी.
१०. प्लॉटची मंजूर नकाशाप्रमाणे जागेवरची आखणी असावी.
११. मंजूर नकाशाप्रमाणे प्लॉट समोरील रस्ता, कच्चा किंवा डांबरी करण झालेला असावा. रस्त्यावर विजेची व्यवस्था ,पाण्याची व्यवस्था, नाल्याची [ड्रेनेज] व्यवस्था असावी.
१२. मंजूर नकाशाप्रमाणे ओपन स्पेस [मोकळी जागा] सोडलेली असावी.
उपयुक्त माहिती...👍
उत्तर द्याहटवासि टी सर्व नाही झाला
उत्तर द्याहटवा