प्लॉट खरेदीनंतर प्लॉटचा ताबा घेणे महत्वाचे आहे. तसेच प्लॉटसंबंधी कागदपत्रांवरती आपले नाव लावणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळेस आपण प्लॉट घेतल्यानंतर कित्येक वर्ष त्या प्लॉटकडे फिरकतही नाही. आपल्याला वाटते कि जागा थोडीच चोरी होणार आहे. परंतु अलीकडील काळामध्ये प्लॉट परस्पर विक्रीचे व अतिक्रमणाचे प्रमाण वाढतच आहेत. त्यामुळे बऱ्याच प्लॉट धारकांची फसवणूक होत आहे. फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी प्लॉट खरेदीनंतर प्लॉटचा रीतसर ताबा घेणे महत्वाचे आहे. ताबा कसा घ्यावा व आवश्यक कागदपत्रे कशी काढावीत याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. प्रत्येक्ष प्लॉटचा ताबा कसा घ्यावा. १. प्लॉट खरेदीकेल्यानंतर ज्याच्याकडून प्लॉट खरेदी केला आहे त्या व्यक्तीकडून प्रत्येक्ष जागेची मोजणी करून, प्लॉटच्या चारही कोपर्यावरती दगडी किंवा सिमिंटचे पोल रोवावेत. २. यानंतर प्लॉटच्या सर्व बाजूस लोखंडी किंवा सि...
जमिनीचे तिच्या वापरानुसार विविध झोन तयार केलेले आहेत. प्लॉट घेण्यापूर्वी प्लॉट चा झोन कोणता आहे हे पाहणे महत्वाचे आहे. कारण झोन नुसार आपल्याला प्लॉट वरती बांधकाम परवानगी मिळत असते. जमिनीच्या झोन चे प्रकार व माहिती खालीलप्रमाणे. १. निवासी झोन (आर -१)-- या झोन मधील प्लॉट मध्ये काही विशिष्ठ वापरासाठीच बांधकाम परवानगी मिळते. याची माहिती खालीलप्रमाणे. १. सर्व प्रकारची निवासी घरे. २. सर्व वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या इमारती. ३. प्राथमिक शाळा, नर्सरी शाळा, हॉस्टेल. ४. धार्मिक वापरासाठीच्या इमारती. उदा. भक्तनिवास. ५. वस्तुसंग्रहालय व सार्वजनिक वाचनालय. ६. घरगुती उद्योग. ७. पार्क, मैदाने. ८. सर्वप्रकारच्या पिठाच्या गिरण्या. ९. लहान आकाराचे व्यवसाय, दररोज वापरातील वस्तूंची दुकाने. उदा. भाजीपाला विक्री, रेशन दुकान आणि बेकारी. टीप- या झोनमध्ये फ...